१. |
कोरोनाच्या प्रादुर्भावा मुळे प्रशासनाने मर्यादित वाहनांचा लिलाव करणेस मान्यता दिलेली असल्याने एकाच वेळी गर्दी होणार नाही या करिता शेतमाल विक्री करणे पूर्वी ऑनलाईन नोंदणी करणे आवश्यक आहे. |
२. |
फक्त ट्रॅक्टर वाहना मधील शेतमालाची नोंदणी केली जाईल. |
३. |
नांदगांव यार्ड मध्ये लिलावाचे दिवशी सकाळी ८.०० वाजे नंतर ट्रॅक्टर वाहनाला प्रवेश दिला जाईल. मुक्कामास ट्रॅक्टर आणू नये. |
४. |
नोंदणी केलेल्या नावाचे आधार कार्ड सोबत आणणे आवश्यक आहे. सदर आधारकार्ड प्रवेशाच्या ठिकाणी दाखविणे आवश्यक आहे. त्याशिवाय प्रवेश मिळणार नाही. व आपल्या चेह-यावर मास्क/रूमाल असल्या शिवाय प्रवेश दिला जाणार नाही. |
५. |
एका नावाने एकच वाहन नोंदणी करता येईल. |
६. |
या लिंक व्यतिरीक्त कोणत्याही मोबाईल नंबर अथवा प्रत्यक्ष कार्यालयात नोंदणी केली जात नाही. |