कृषी उत्पन्न बाजार समिती, नांदगाव, नाशिक


  • सुचना-


  • १. कोरोनाच्या प्रादुर्भावा मुळे प्रशासनाने मर्यादित वाहनांचा लिलाव करणेस मान्यता दिलेली असल्याने एकाच वेळी गर्दी होणार नाही या करिता शेतमाल विक्री करणे पूर्वी ऑनलाईन नोंदणी करणे आवश्यक आहे. 
    २. फक्त ट्रॅक्टर वाहना मधील नोंदणी केली जाईल.
    ३. बोलठाण यार्ड मध्ये लिलावाचे दिवशी सकाळी ८.०० वाजे नंतर ट्रॅक्टर वाहनाला प्रवेश दिला जाईल. मुक्कामास ट्रॅक्टर आणू नये.
    ४. नोंदणी केलेल्या नावाचे आधार कार्ड सोबत आणणे आवश्यक आहे. सदर आधारकार्ड प्रवेशाच्या ठिकाणी दाखविणे आवश्यक आहे. त्याशिवाय प्रवेश मिळणार नाही. व आपल्या चेह-यावर मास्क/रूमाल असल्या शिवाय प्रवेश दिला जाणार नाही.
    ५. एका नावाने एकच वाहन नोंदणी करता येईल.
    ६. या लिंक व्यतिरीक्त कोणत्याही मोबाईल नंबर अथवा प्रत्यक्ष कार्यालयात नोंदणी केली जात नाही.