नांदगांव बाजार समिती बद्दल माहिती
नांदगांव बाजार समितीचा विद्यमान कारभार सभापती श्री.सतिष विनायक बोरसे व उपसभापती श्री. दिपक सुर्यभान मोरे , सचिव अमोल खैरनार व सर्व संचालक मंडळ यशस्वी पणे पार पाडीत आहे.
नांदगांव बाजार समितीचे मुख्य बाजार आवार व बोलठाण , न्यायडोंगरी उपबाजार आवार अस्तित्वात आहे. नांदगांव बाजार समितीचे कार्यक्षेत्र एकूण 67 गावे आहेत. सुरूवातीच्या काळात बाजार समितीमध्ये प्रामुख्याने भुसार धान्यमाल तसेच कापूस , भूईमुग शेंगा या नगदी पिकांची आवक असायची . परंतू गेल्या 15 वर्षापासुनचे काळात कांदा व मका शेतमालाची आवक वाढली असून नांदगांव बाजार समिती सह बोलठाण उपबाजार कांदा व मका मालाची बाजारपेठ म्हणून ओळखली जात आहे.
सन 2015 पासून बोलठाण व न्यायडोंगरी या उपबाजार आवारावर शेतमाल लिलावाचे दैनंदिन कामकाज सुरू करणेत आलेले आहेत.
शेतकरी व व्यापारी यांचे सहकार्यातून लिलावाचे कामकाज सुरू करणेत येवून आज रोजी बोलठाण बाजार पेठ कांद्याची प्रमुख बाजारपेठ म्हणून नावलौकीक मिळवत असून सदर उपबाजार आवाराचे आर्थिक उत्पन्नात दिवसेंदिवस वाढ होत आहे. तसेच न्यायडोंगरी उपबाजार आवारावर सुद्धा हंगामामध्ये चांगल्या प्रकारे मका शेतमालाची आवक होत असल्याने त्याद्वारे बाजार समितीस चांगले उत्पन्न मिळू लागले आहे. नांदगांव बाजार समितीचा उत्पन्नाचा आलेख हा वाढता आहे. बाजार समितीने महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाकडून सन 2010/11 मध्ये 3 कोटी रूपये कर्ज घेतलेले होते. समितीने गेल्या दोन वर्षात सुमारे 2.90 कोटी रूपयांची संपूर्ण कर्ज परतफेड केलेली आहे.
नांदगांव बाजार समिती मध्ये शेतकरी , व्यापारी , हमाल मापारी इ. घटकांचे हिताचे दृष्टीकोनातून कामकाज करणेत येत असून सदर घटकांच्या सहकार्यातून बाजार समितीची प्रगती करणेस बाजार समिती संचालक मंडळ प्रयत्नशिल आहे.
बाजार समितीचे ठळक वैशिष्ट्ये
- शेतमाल विक्री नंतर शेतकरी वर्गास कार्यालया मध्ये व्यापारी वर्गातर्फे रोख पेमेंट अदा करणेत येते.
- नांदगांव यार्डवर बाजार समितीचा स्वतंत्र इले.भूईकाटा असून रू. 10/- फक्त शुल्क आकारले जाते.
- नांदगांव यार्डवर शेतकरी वर्गासह सर्व घटकांसाठी पिण्याचे शुद्ध पाण्या करिता वॉटर एटीएम सुरू केले असून 1 रूपयामध्ये 1 लिटर शुद्ध व थंड आर.ओ.चे पाणी उपलब्ध.
- नांदगांव यार्डवर स्वच्छ शौचालयाची व्यवस्था.
- शेतकरी वर्गासह सर्वांना बाजारभाव कळणे कामी बाजार समितीचे एकूण 29 व्हॉटसअप ग्रुप बनविले असून त्याद्वारे बाजारभावा सह इतर माहिती तंत्रज्ञान शेतकरी वर्गा पर्यंत पोहोचविले जाते.
- बाजार समितीचे सर्व प्रशासकिय कामकाज संगणकीकृत झालेले आहे.
- कार्यालयीन कामकाजा बरोबरच सौदा पट्टी , काटापट्टी यांचेही संगणकीकरण करणेत आलेले असून काटापट्टी नोंद ही ऑनलाईन पद्धतीने होत आहेत.
- शेतकरी वर्गा बरोबरच कर्मचारी , व्यापारी , मापारी यांना बाजार समितीने मोबाईल APP उपलब्ध करून दिलेले आहे. यावर बाजार समिती मध्ये झालेले त्यांचे बाबतीतील सर्व व्यवहार बघू शकतात.
- बोलठाण यार्डवर पावसाळ्यात वाहने उभी करतांना अ़डचण निर्माण होत असल्याने यार्डचे काही भागात डबर सोलिंग , मुरूम टाकणेत आलेले आहे.
- शेतकरी वर्गाचे वाहन प्रवेश फी , गुरे प्रवेश फी , विविध दाखले फी निशुल्क करणेत आलेली आहेत.